CUET PG चा निकाल जाहीर; साडे चार लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

देशातील ३९ केंद्रीय, ४५ राज्य सरकार, १० सरकारी संस्था आणि १०३ खाजगी आणि डीम्ड विद्यापीठांसह एकूण १९७ विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक आहे.

CUET PG चा निकाल जाहीर; साडे चार लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
CUET PG Exam Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

CUET PG Result 2023 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून CUET PG चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. NTA ने cuet.nta.nic.in या वेबसाईट वर निकाल जाहीर केला आहे. NTA द्वारे CUET PG निकालाच्या  तारखेबाबत कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती. गुरूवारी रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. (CUET PG Result Declared)

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्विट करत निकालाबाबत माहिती दिली. "CUET PG २०२३ चा निकाल cuet.nta.nic.in या वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. तसेच  निकालाचे तपशील संबंधित विद्यापीठांनाही  पाठवण्यात आले आहेत," असे कुमार यांनी म्हटले आहे.

सूरज मांढरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना दणका; अनधिकृत शाळाप्रकरणी कारवाईची तंबी, दहा दिवसांत मागविला खुलासा

CUET PG २०२३ परीक्षा ५ ते १७ जून  दरम्यान कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात आली होती. दोन फेऱ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. NTA ने २२ ते ३० जून  या कालावधीत फेरपरीक्षा घेतली  होती. १३ जुलै रोजी तात्पुरती आन्सर की  प्रसिद्ध करण्यात आली होती.  १३ ते १६ जुलै  दरम्यान उमेदवारांकडून तात्पुरत्या आन्सर की वर आक्षेप मागवण्यात आले होते. 

देशातील ३९ केंद्रीय, ४५ राज्य सरकार, १० सरकारी संस्था आणि १०३ खाजगी आणि डीम्ड विद्यापीठांसह एकूण १९७ विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. त्यानुसार ४ लाख, ५९ हजार ८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD