यंदा वाचन प्रेरणा दिनी 'उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा'!

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी आणि वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या उद्देशान वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदा वाचन प्रेरणा दिनी 'उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा'!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्या स्मृती जनत करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस राज्यात वाचन प्रेरणा दिन (Vachan Prerana Din) म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या ३५० व्या शिवराज्याभिषकाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचारांचा जागर मराठी मनात व्हावा म्हणून यंदा ‘’३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा" ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करुन वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे.

 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी आणि वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या उद्देशान वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्त मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, विकास, जतन व संवर्धनासाठीही प्रयत्न केले जातात. यावर्षीपासून हा दिन एक उत्सव म्हणून साजरा करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारकडून भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

 

शिक्षक भरती : ‘पवित्र’वर ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी, उरले फक्त पाच दिवस

त्यानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी मराठीचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे कसा करता येईल या विषयावरील तज्ञांच्या कार्य़शाळा आयोजित कराव्यात, या संस्थांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

सांस्कृतिक कार्यक्रम/चर्चासत्रे / प्रशिक्षण इत्यादी माध्यमातून दरवर्षी वाचन संस्कृती वाढीस लागण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजमाध्यमे / प्रत्यक्षरित्या, ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने कार्यक्रम करण्यात यावेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट देऊन प्रोत्साहन द्यावे, ललित साहित्य यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता विज्ञान, तंत्रज्ञान व्यवस्थापन, पर्यावरण. आरोग्य, संगणक, संकेतस्थळं, अवकाश विज्ञान इत्यादी कालानुरूप विषयांचा देखील समावेश कार्यक्रमात करण्यात यावा, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

 

रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी १) अनुवादलेखन २) व्यावसायिक लेखन ३) पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया ४) ई-बुक ५) स्व-प्रकाशन ६) युनिकोडचा वापर ७) ऑनलाईन पुस्तक विक्री ८) लेखक प्रकाशन करार २) संहिता लेखन १०) विश्वकोशाबाबत माहिती कार्यशाळा ११) लघुपट (Short Filim), माहितीपट (Documentary) आदी विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व संस्थांनी सामाजिक माध्यमांवर (Social Media) मराठी वाचन कट्टा निर्मिती करावी, मराठी आभासी (Digital) / प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करावे, असेही सुचविण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j