विद्यार्थ्यांनी केला स्वच्छतेचा जागर

पत्र सूचना कार्यालयाच्या सहकार्याने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन विभागात पार पडलेल्या या स्पर्धांमधून १२० हून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी केला स्वच्छतेचा जागर
Kendriya Vidyalay, Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने  पुण्यातील गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalay) चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पत्र सूचना कार्यालयाच्या सहकार्याने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन विभागात पार पडलेल्या या स्पर्धांमधून १२० हून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते. (Kendriya Vidyalay News)

विद्यालयाच्या प्राचार्या शबाना खान आणि पुण्यातील पत्र सूचना कार्यालयाचे  उपसंचालक महेश अय्यंगार यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्या खान यांनी मुलांना आपला वर्ग, शाळा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट

प्रत्येकाने स्वच्छतेच्या बाबतीत हे कर्तव्य पार पाडले तर देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वासही खान यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे यावेळी  प्रदर्शन भरविण्यात आले होते.

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेचे उपमुख्याध्यापक कनाराम चौधरी, कला शिक्षक अलीम बागवान आणि उज्वल अवारे यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.