पुणे जिल्ह्यात ‘या’ गावातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण; स्प्रे, मिरची पुड तोंडावर टाकण्याच्या घटना

अवसरी खुर्द गावच्या हद्दीत भोर मला रस्त्यालगत डिंभे उजवा कालवा परिसातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही घटना घडल्या आहेत. गावातील भैरवनाथ विद्यालयामध्ये शिकणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी आहेत.

पुणे जिल्ह्यात ‘या’ गावातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण; स्प्रे, मिरची पुड तोंडावर टाकण्याच्या घटना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील अवसरी खुर्द गावात विद्यार्थिनींसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शाळेत (School) जाणाऱ्या विद्यार्थिनींना अज्ञात तरुणांकडून लक्ष्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी एका विद्यार्थिनीच्या (School Girl) तोंडावर मिरची पुड टाकल्याची घटना घडली आहे. त्याच परिसरात १५ दिवसांपुर्वी एका विद्यार्थिनीच्या अंगावर स्प्रे मारून तिला बेशुध्द करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनांमुळे पोलीस प्रशासनासह गावकरी सतर्क झाले आहेत.

 

अवसरी खुर्द गावच्या हद्दीत भोर मळा रस्त्यालगत डिंभे उजवा कालवा परिसातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही घटना घडल्या आहेत. गावातील भैरवनाथ विद्यालयामध्ये शिकणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी आहेत. बुधवारी घडलेल्या घटनेमध्ये दोघी विद्यार्थिनी सायकवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना अडवले. त्यानंतर एका मुलीच्या तोंडावर मिरची पुड टाकली. तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर दोघे जण पळून गेले.

NCERT चा मोठा निर्णय; शालेय पुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

 

काही दिवसांपुर्वी याच परिसरात एका विद्यार्थिनीच्या अंगावर स्प्रे मारल्याची घटना घडली होती. दोन्ही घटनांमधील व्यक्ती कुठून आल्या आणि कुठे गेल्या याचा कुणालाही थांगपत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव यांनी बुधवारी घडलेल्या घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली.

 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच गावकरी व शाळेतील शिक्षकांना काही उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. पोलिसांकडूनही या परिसरात गस्त घातली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करताना एकत्रितपणे जावे. अनोखळी, संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास पोलीस, पालक, किंवा शाळेतील शिक्षकांना माहिती देण्याच्या सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकांनीही काही दिवस विद्यार्थ्यांना शाळेत सोडवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k