सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ग्रंथप्रदर्शन; तीसहून अधिक प्रकाशकांची पुस्तके

जयकर ज्ञानस्रोत केंद्रात हे ग्रंथप्रदर्शन दिनांक १८ जुलै ते २० जुलै असे तीन दिवस खुले राहणार आहे. ३० पेक्षा जास्त विक्रेते आणि प्रकाशक यांनी त्यांचे नवीन पुस्तक संग्रह या दालनात प्रदर्शित केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ग्रंथप्रदर्शन; तीसहून अधिक प्रकाशकांची पुस्तके
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना स्मृतिदिनानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त स्मृतिदिनाचे औचित्य साधून जयकर ज्ञानस्रोत केंद्रामार्फत ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. (Savitribai Phule Pune University News)

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रामार्फत ग्रंथप्रदशन आयोजित केले जाते. या प्रदर्शनाचे उद्घाटनही कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले.

SPPU NEWS: कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, विद्यापीठाचा निकाल लांबण्याची शक्यता

जयकर ज्ञानस्रोत केंद्रात हे ग्रंथप्रदर्शन दिनांक १८ जुलै ते २० जुलै असे तीन दिवस खुले राहणार आहे. ३० पेक्षा जास्त विक्रेते आणि प्रकाशक यांनी त्यांचे नवीन पुस्तक संग्रह या दालनात प्रदर्शित केले आहे. शैक्षणिक विभागप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले असून यास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करताना आणि ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनाच्या प्रसंगी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, अध्यासनप्रमुख डॉ. सुनिल भंडगे, संचालक डॉ. विलास आढाव तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD