MIMO तंत्रज्ञान आणि 5G कम्युनिकेशन या विषयावर पुणे विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तंत्रज्ञान आणि ५ जी कम्युनिकेशन या विषयावर इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणशास्त्र विभागातर्फे दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

MIMO तंत्रज्ञान आणि 5G कम्युनिकेशन या विषयावर पुणे विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune VidyapithMIMO तंत्रज्ञान आणि ५ जी कम्युनिकेशन (5G Communication) या विषयावर इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणशास्त्र विभागातर्फे दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन (Organization of National Workshop) करण्यात येणार आहे आहे. वायरलेस आणि MIMO तंत्रज्ञानातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि तज्ञांचा सहभाग असलेली ही कार्यशाळा पुण्यातील अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा असेल. कार्यशाळेचे आयोजन डॉ. प्रणोती बनसोडे-गायकवाड, डॉ. आदिती जोशी, प्रा.सुभाष घैसास व प्रा.संजय ढोले या शिवाय इतर अनेक प्राध्याकांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांच्या हस्ते होणार आहे. 

या कार्यशाळेत खालील विषयांचा समावेश असणार आहे 
१. MIMO तंत्रज्ञानाचा 5G कम्युनिकेशन मधील वापर २. स्वदेशी 5G सोल्यूशन्स आणि 6G उपक्रम ३. आर्टिफिसिअल इंटेलिजन्स आणि MIMO तंत्रज्ञान ४. 5G कम्युनिकेशनच्या पलीकडील आव्हाने ५. लष्करी संप्रेषणासाठी सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ (SDR) आणि नेटवर्क्समधील प्रगती ६. फ्यूचर ऑफ मिलिटरी कम्युनिकेशन्स ७. शस्त्रास्त्रांमध्ये टेलीमेट्री ८. ॲडव्हान्स ऑटोमोबाईल सिस्टम्समध्ये MIMO अँटेना उपयोग पुणे विद्यापीठात MIMO तंत्रज्ञानाबाबत चाललेले संशोधन या विषयांबाबत मार्गदर्शन आणि परिसंवाद होणार आहे.  

या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बी.के. दास, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि महासंचालक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टम), डीआरडीओ, बेंगळुरू येणार आहेत. श्री एल.सी. मंगल, उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि संचालक, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन लॅबोरेटरी, डीआरडीओ, डेहराडून, डॉ. एम. एच. रहमान, संचालक, जेएटीसी-आयआयटी दिल्ली, स्कूल ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिकल सायन्सेस, डीआयएटी, पुणे, डॉ. चिन्मय भट्टाचार्य, वैज्ञानिक जी (निवृत्त) हे या कार्यशाळेत प्रमुख वक्ते असतील. त्याशिवाय इतर अनेक आमंत्रित वक्ते कार्यशाळेत तांत्रिक सादरीकरण करतील.

या कार्यशाळेसाठी देशभरातून 5G तंत्रज्ञान तसेच दूरसंचार विषयांमध्ये संशोधन करणारे डीआरडीओचे अनेक शास्त्रज्ञ, अध्यापक आणि संशोधन विद्यार्थीं त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे.  कार्यशाळेसाठी नोंदणीची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२४ ही  आहे. कार्यशाळेत नोंदणीसाठी कृपया https://events.unipune.ac.in/sites/Workshop_MIMO/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.