मॉडर्न कॉलेजच्या ‘कॅलिडोस्कोप’च्या १५ व्या खंडाचे प्रकाशन

कॅलिडोस्कोप हे गेल्या 15 वर्षांपासून मानसशास्त्र विभागाने प्रकाशित केलेले इन हाउस जर्नल आहे. यावर्षीची थीम 'जीवन हा संघर्ष' अशी होती.

मॉडर्न कॉलेजच्या ‘कॅलिडोस्कोप’च्या १५ व्या खंडाचे प्रकाशन

गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालयात  (modern college ganeshkhind) 'कॅलिडोस्कोप' खंड 15 चा  प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. कॅलिडोस्कोप हे गेल्या 15 वर्षांपासून मानसशास्त्र विभागाने प्रकाशित केलेले इन हाउस जर्नल आहे.  यावर्षीची थीम 'जीवन हा संघर्ष' अशी होती.  इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील लेख आणि कविता असलेले जर्नल त्रिभाषी आहे.

 कॅलिडोस्कोप खंड 15 चे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक व लेखक डॉ. प्रदीप आवटे (dr.pradeep avate )यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात,(sanjay kharat ) मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. साधना नातू ,प्रा. नशोम क्रॅस्टो प्रा. स्वाती जगताप तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते. मागील १५ वर्षात प्रेम, आनंद, व्यसनाधिनता, भारत मानसशास्त्राचे 100 वर्ष, जगावर प्रभाव पाडणारे मानस असे अनेक मानसशास्त्रीय विषयावर लिहिण्यात आले आहे.

'जीवन हाच संघर्ष' हा या वर्षाचा विषय होता. या अंकात निवडक लेख , कविता, चित्र इ.  चा समावेश होता. व्यसनमुक्ती, कोविड १९  आणि मानसिक आरोग्य, आनंद, जीवन रंगीत आहे इत्यादी विषयावर लिहिण्यात आले आहे. मुखपृष्ठ विद्यार्थिनी कु. तनया जाधव हिने डिझाइन केले. कार्यक्रमात डॉ. प्रदीप आवटे , डॉ.संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. डॉ. साधना नातू, यांनी उपक्रमाची संकल्पना मांडली.