कुलगुरू पदासाठी आता उरले तिघे ; पुणे विद्यापीठातील दोघांची नावे मागे पडली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून नावाच्या अधिकृत घोषणेसाठी प्रतिक्षा करावी लागली आहे.

कुलगुरू पदासाठी आता उरले तिघे ; पुणे विद्यापीठातील दोघांची नावे मागे पडली
SPPU Vice Chancellor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू (SPPU Vice Chancellor) पदाची निवड लांबल्याने कुलगुरू पदी कोण विराजमान होणार, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पाच जणांच्या मुलाखती होऊन दहा दिवस उलटले तरी अजूनही नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठातील दोन इच्छुक उमेदवारांसंदर्भातील वादग्रस्त माहिती सोशल मीडियावर व्हायरला झाली. त्यामुळे ही दोन नावे वगळून उर्वरित तीन उमेदवारामधून एका उमेदवाराची निवड होण्याची शक्यता तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. तसेच येत्या आठवड्याभरात कुलगुरू निवडीची घोषणा केली जाणार असल्याचा अंदाज विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर (Parag kalkar),पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार (Avinash Kumbhar), भौतिकशास्त्र विभागातील डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole), पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी (Suresh Gosawi) आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी (Vijay Phulari) यांचा समावेश आहे.

NEP 2020 Breaking News : संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी पुढील वर्षापासून

डॉ. विजय फुलारी वगळता इतर चौघे जण पुणे विद्यापीठातीलच आहेत. मुलाखती पार पडल्यानंतर सोशल मीडियात सुरूवातीला नावांची जोरदार चर्चा होती. पण आता त्यातील दोन नावे मागे पडल्याचे समजते. एका इच्छूकाच्या नावावर गुन्हा दाखल असून दुस-या उमेदवाराविरोधात एका विद्यार्थिनीने काही वर्षांपुर्वी फेसबुकावर केलेली तक्रार पुन्हा व्हायरला झाली होती. त्यामुळेच या दोघांची नावे मागे पडल्याची जोरदार चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

प्राध्यापक संघटनेचा एनईपी अंमलबजावणीला नकार ; विद्यापीठांसमोर मांडणार भूमिका

पुणे विद्यापीठातील दोघांची नावे मागे पडल्याने आता उरलेल्या दोघांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. तसेच डॉ. फुलारी यांचे नावही कमी अधिक प्रमाणात चर्चेत  आहे. आठवडाभरात तिघांपैकीच एका नावाची घोषणा होणार आहे. त्यात पुणे विद्यापीठातीलच नाव असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पुणे कुलगुरू पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते.हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo