सरकारी नोकरीसाठी मेगा भरती;  दहावी-बारावी पास असाल तर लागा तयारीला

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) अनुक्रमे २ हजार ८५९ आणि ९ हजार २१२ पदांसाठी भरती होणार आहे.

सरकारी नोकरीसाठी मेगा भरती;  दहावी-बारावी पास असाल तर लागा तयारीला
CRPF Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) अनुक्रमे २ हजार ८५९ आणि ९ हजार २१२ पदांसाठी भरती होणार आहे. EPFO मधील पदांसाठी इयत्ता बारावी आणि पदवीधर तर CRPF साठी इयत्ता दहावा ही शैक्षणिक पात्रता आहे. (Recruitment 2023)

EPFO या क्षेत्रात सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक या पदासाठी एकूण २ हजार ८५९ जागांवर पदभरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २६ एप्रिलपर्यंत अर्ज करायचे आहेत. भरती अंतर्गत ऑनलाइन नोंदणी 27 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान आहे असे उमेदवार या पदासाठी पात्र असतील, अशी माहिती संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. (Recruitment News Update)

पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि कौशल्य चाचणी अशा दोन पातळ्यांवर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. कौशल्य चाचणीमध्ये उमेदवारांचे टायपिंग वेग आणि डिक्टेशन स्पीड तपासण्यात येणार आहे. EPFO च्या www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.

CRPF मध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करण्याची संधी आहे. CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या ९ हजार २१२ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगड सेक्टरने कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी) पदाच्या भरतीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही पदे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार CRPFच्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे, अशी माहिती CRPF ने जाहीर केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. ही पदभरती देशभरातून होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ही परीक्षा १ ते १३ जुलै च्या दरम्यान होणार आहे.