JEE Mains  B.Tech/B.E पेपरसाठी हॉल तिकीट उपलब्ध 

२७ जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या B.Tech/BE परीक्षेसाठी JEE Mains  हॉल तिकीट जारी केले आहे.

JEE Mains  B.Tech/B.E पेपरसाठी हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (JEE Mains) सत्र २ पेपर १ चे  हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ( NTA) अधिकृत वेबसाइट jee main.nta.ac.in वर २७ जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या B.Tech/BE परीक्षेसाठी JEE Mains  हॉल तिकीट जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

JEE Mains B.Tech/BE परीक्षा २७, २९, ३०, ३१  जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिला सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा दुपारी ३ ते ६ या वेळेत असेल.  दरम्यान JEE Main २०२४ सत्र १ परीक्षा २४ जानेवारिपासून सुरु करण्यात आल्या आहेत. 

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड 

* सर्व प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in ला भेट द्यावी.
* २७ जानेवारीच्या परीक्षेसाठी B.Tech किंवा पेपर १ प्रवेशपत्र डाउनलोड लिंक उघडा. 
* आता तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख टाका.
 * अभ्यासक्रम निवडा आणि प्रदर्शित केलेला पिन प्रविष्ट करा. 
* प्रवेशपत्र तुमच्या समोर असेल. ते पहा आणि डाउनलोड करा.