MHT CET 2023 : मंगळवारपासून परीक्षा सुरू; ही घ्या काळजी नाहीतर परीक्षेला मुकाल!

पीसीएम ग्रुपची परीक्षा ९ ते १४ मे यादरम्यान आणि पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.

MHT CET 2023 : मंगळवारपासून परीक्षा सुरू; ही घ्या काळजी नाहीतर परीक्षेला मुकाल!
MHT CET 2023 Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी तंत्रज्ञान (Agriculture Technology) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची (Admission) एमएचटी सीईटी २०२३ (MHT CET 2023) या सामाईक प्रवेश परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. पीसीएम ग्रुपची (PCM Group) परीक्षा ९ ते १४ मे यादरम्यान आणि पीसीबी ग्रुपची (PCB Group) परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा म्हणजे महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक महिन्यांपासून तयारी करतात. खरेतर पालकांचीही या काळात परीक्षा सुरू असते. विद्यार्थ्यांसह पालकांवरही ताण असतो. आता परीक्षेसाठी काही तासच उरले आहेत. त्यामुळे परीक्षेला जाताना आवश्यक त्या गोष्टींचे नियोजन आतापासूनच करायला हवे. अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागू शकते.

हेही वाचा : आरटीई मान्यतेशिवाय चालणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग मेहेरबान?

परीक्षेसाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश पत्र. परीक्षा कक्षाकडून सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी प्रवेश पत्र अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून घ्यावी. ही प्रिंट घेतली नसेल, तर विद्यार्थ्यांनो लगेचच कामाला लागा. याशिवाय विद्यार्थ्यांना खालील गोष्टींचीही दक्षता घ्यावी लागेल.

परीक्षेला जाताना ही घ्या काळजी –

  1. प्रवेशपत्रावरून परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी काळजीपूर्वक वाचावे.
  2. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचे मुख्यद्वार बंद होण्याच्या वेळेपूर्वी पोहचण्यासाठी योग्य ते नियोजन करावे.
  3. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जावे.
  4. परीक्षेला जाताना उमेदवाराने त्याचबरोबर आपली ओळख दर्शविणारी प्रवेशपत्रामध्ये नमूद ओळखपत्रे जसे की, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट आदी सोबत ठेवावीत.
  5. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मुळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
  6. प्रवेशपत्रावरील सुचनांचे वाचन करून त्याप्रमाणे पालन करावे.

    शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

    https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2