NLC इंडिया अंतर्गत मेगा भरतीला सुरुवात, असा करा अर्ज

या भरती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षणातील SME आणि तांत्रिक (O and M) औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 239 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

NLC इंडिया अंतर्गत मेगा भरतीला सुरुवात, असा करा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NLC इंडिया अंतर्गत (NLC India Limited Bharti 2024) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षणातील SME आणि तांत्रिक (O and M) औद्योगिक प्रशिक्षणार्थी (SME and Technical (O and M) Industrial Trainees) पदांच्या एकूण 239 रिक्त जागा (Total 239 vacancies) भरल्या जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असून येत्या  31 मे पर्यंत  (Last date 31st May) अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला https://www.nlcindia.in/new_website/index.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. 

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 239 रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक औद्योगिक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी 10 वी व संबंधित ट्रेड मधून ITI पास आणि डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण झालेले आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 37 वर्ष वयाची अट असणार आहे. तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी च्या उमेदवारांना 05 वर्ष सुट देण्यात आली आहे. 

या पद्धतीने भरा अर्ज 

सर्वप्रथम NLC च्या अधिकृत वेबसाईट  https://www.nlcindia.in/new_website/index.htm  ला भेट द्या. संबंधित साईटवर गेल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल, तो वापरून लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागदपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्या प्रमाणे अपलोड करायची आहेत. अर्ज सबमिट करुन त्यांची प्रिंट घ्यायची आहे.