Ajit Pawar statement of Ph.D : अजित पवार यांच्या व्यक्तव्याचे राज्यभर पडसाद ; संशोधक विद्यार्थी आक्रमक

'पीएचडी करून काय दिवा लावणार आहे?'

Ajit Pawar statement of Ph.D : अजित पवार यांच्या व्यक्तव्याचे राज्यभर पडसाद ; संशोधक विद्यार्थी आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएच. डी. संदर्भात केलेल्या वक्तव्याचा (statement of Ph.D) राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. बुधवारी पुण्यात बालगंधर्व जवळील झाशी राणी चौकात नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियासह (एनएसयुआय- NSUI) विविध विद्यार्थी संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या वक्तव्याचा घोषणा देत निषेध नोंदवला . तसेच सारथी, बार्टी ,महाज्योती (Sarathi, Barty, Mahajyoti) आदी संस्थांमध्येतर्फे पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप (fellowship) देण्यात यावी, अशी मागणी केली.

सारथी संस्थेच्या माध्यमातून पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जात होती. मात्र, राज्य शासनाने केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित असून या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देताना विद्यार्थी 'पीएचडी करून काय दिवा लावणार आहे?'  असा उलट सवाल केला. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संशोधन केल्यामुळेच शास्त्रज्ञांनी दिव्याचा शोध लावला, असे खोचक वक्तव्य काही विद्यार्थी करत आहेत. तसेच अजित पवार यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : अजित पवार यांच्या पीएच.डी.च्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले ?

 अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उमटले आहेत. येथील विद्यार्थ्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. तसेच या विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुद्धा विद्यार्थ्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निषेध रॅली काढली. विद्यार्थ्यांनी घोषणा देत अजित पवार यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.