अजित पवार यांच्या पीएच.डी.च्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले ?

दादा जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो.

अजित पवार यांच्या पीएच.डी.च्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील मुलांकडे संधी, क्षमता, गट्स आहेत. ते सरकारी पैशांवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यावर तुम्ही शंका घेत असाल तर ते योग्य नाही. ही मराठी पोरं आहेत. त्यामुळे दादा जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो. कोणाच्याही भवितव्यावर शंका घेऊ नये. जी सरकारकडून मदत मिळणे अपेक्षित आहे, ती मिळालीच पाहिजे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना  देताना दिली.

हेही वाचा : विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा सवाल

सारथीच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी फेलोशीपा मिळावी, याबाबत सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.तसेच सारथीने जाहिरात प्रसिध्द केली.त्यावेळी किती विद्यार्थ्यांना फेलोशीप दिली जाईल, याबाबत कोणतीही अट टाकली नव्हती.मात्र, तब्बल सहा महिन्यांनी 200 विद्यार्थ्यांना फेलोशीपा दिली जाईल,असे जाहीर करण्यात आले.त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशीप द्यावी,अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.त्यावर विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवा लावणार आहेत,असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.त्यावर राज्यभरात विद्यार्थीआंदोलन करून निषेध करत आहेत.राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांकडून तीव्र शब्दांत संताप व्यक्त होत आहे 

रोहित पवार म्हणाले, युवांबाबत कोणी नाही  शंका घेतली पाहिजे. ही गरिबांची पोरं आहेत. पीएचडीसाठी जी काही तीन – पाच वर्षे लागतात, त्यासाठी मोठ्या निधीची गरज असते. त्यामुळे ते मदतीकरता सरकारकडे येतात.तो श्रीमंताचा पोरगा असता तर तो सरकारकडे आला असता का? असेही रोहित पवार वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.