ताण न घेता फक्त अभ्यास अन् परिस्थितीशी दोन हात! अवनी अन् कल्पनाची अव्वलस्थानी झेप

कल्पनाची अभ्यासातील रुची पाहून तिच्या कॉलेजमधील शिक्षकांनी तिची फी भरली, तिच्या पुस्तकांचा खर्च उचलला. हा विश्वास कल्पनाने सार्थ ठरवला आहे.

ताण न घेता फक्त अभ्यास अन् परिस्थितीशी दोन हात! अवनी अन् कल्पनाची अव्वलस्थानी झेप
Kalpana Jadhav and Avani Bamb

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दोघींची घरची स्थिती वेगवेगळी. पण दोघींनी जिद्दीच्या जोरावर कठोर परिश्रम करत बारावीच्या निकालात (HSC Result) आपआपल्या महाविद्यालयात अव्वलस्थान पटकावले आहे. वारजे माळवाडी येथील मोहोळ विद्यालयात वाणिज्य शाखेत ८७.५० टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कल्पना जाधव या विद्यार्थिनीने अत्यंत हलाकीच्या परिस्थतीत इथपर्यंत मजल मारली आहे. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (BMCC) अवनी बंब हिने कसलाही ताण न घेता अभ्यासाचे योग्य नियोजन करत प्रथम क्रमांक मिळवला. (Maharashtra HSC Result)

कोरोना काळात कल्पनाच्या वडिलांचे निधन झाले. आई स्वयंपाकाची आणि टेलरिंगची कामे करून घर चालवते. कल्पनाची अभ्यासातील रुची पाहून तिच्या कॉलेजमधील शिक्षकांनी तिची फी भरली, तिच्या पुस्तकांचा खर्च उचलला. याविषयी 'एज्युवार्ता' शी बोलताना कल्पना म्हणाली, वडील ड्राइव्हर होते. कोरोनामध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आईनेच घराची जबाबदारी घेतली. आई बाहेर स्वयंपाकाची कामे करती, त्यानंतर घरी आल्यावर ब्लाउज शिवते.

बारा तास रुग्णालयात नोकरी अन् रात्री शाळेत; बारावीच्या परीक्षेत मुस्कान पहिली

एक लहान भाऊ आहे, तो यंदा १० वीला आहे. वडील गेले तेव्हा मी १० वी मध्ये होते. त्यानंतर पुढचे शिक्षण घेणे अवघड झाले होते. पण आमच्या कॉलेजमधील नामदेव काळभोर, अर्चना चव्हाण, आनंदा दराडे या शिक्षकांनी माझी फी भरली, मला पुस्तके घेऊन दिली. तर ऋणानुबंध सामाजिक संस्थेने माझ्या अकाऊंटच्या क्लासची फी भरली. यांच्या सहकार्यामुळेच मी माझे पुढचे शिक्षण घेऊ शकले, असे कल्पनाने सांगितले.

काही टेंशन्स चांगले असतात

परीक्षेचे अभ्यासाचे टेंशन  जरूर घ्यावे, कारण काही टेंशन चांगले असतात. त्याने आपल्याला प्रोत्साहन मिळते. पण त्याच वेळेस अभ्यास आणि रोजचे आयुष्य याचे ताळमेळ ही राखायला हवे. विरंगुळा सुद्धा खूप महत्वाचा असतो, असा कानमंत्र बीएमसीसी महाविद्यालयात प्रथम आलेल्या अवनी बंब या विद्यार्थिनीने दिला आहे. ती ९६.८३ टक्के गुणांसह प्रथम आली आहे. 

विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार

'एज्युवार्ता' शी बोलताना अवनी म्हणाली, "मी दररोज नियमितपणे ४ तास अभ्यास करत होते. परीक्षा जवळ आली तशी मी ६ तास अभ्यास करू लागले. मला अभ्यासाचा ताण होता पण पण मी ज्यावेळी अभ्यास करायचे त्यावेळी फक्त अभ्यासच करायचे. जेव्हा एन्जॉयमेंट असायची तेव्हा खूप एन्जॉय पण करायचे, दोन्ही मध्ये बॅलन्स करत होते. माझ्या मोठ्या भावाने मला अभ्यासाचे टाईमटेबल करून दिले होते. आई बाबा आणि कॉलेज मधील शिक्षकांनीही खूप मदत केली." बीएमसीसी विद्यालयात १० विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शुभदा अंकोलकर, गार्गी दीक्षित, आर्या कुलकर्णी, सुरभी लालगे आणि पलक कोठारी यांचा त्यात समावेश आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo