मेरी माटी मेरा देश उपक्रम : अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून देशाबद्दल प्रतिबद्ध होऊयात - राजेश पांडे

देशाच्या मातीने देशाला अनेक सुपुत्र दिले आहेत. त्या मातीला नमन करूयात. दिल्लीत निर्माण होणाऱ्या अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून देशाबद्दल प्रतिबद्ध होऊयात,

मेरी माटी मेरा देश उपक्रम : अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून देशाबद्दल प्रतिबद्ध होऊयात - राजेश पांडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

" भारत देशाला बलिदान त्यागाचा इतिहास असून या इतिहासाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. या देशाच्या मातीने देशाला अनेक सुपुत्र दिले आहेत. त्या मातीला नमन करूयात. दिल्लीत निर्माण होणाऱ्या अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून देशाबद्दल प्रतिबद्ध होऊयात ", असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी केले.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश अंतर्गत' पुणे जिल्हा स्तरीय (ग्रामीण) सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी राजेश पांडे बोलत होते. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडवणीस, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रा.से.यो. संचालक डॉ. सदानंद भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.

 डॉ. पराग काळकर म्हणाले,  मातीशी नातं पुनर्जीवित करणारा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना त्यातून वाव मिळाला पाहिजे. आपल्याला समृद्ध संस्कृती लाभली असून लोककला, लोकवाद्य, लोकसंगीत हे आपल्या संस्कृतीची संचितं आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे.


स्पर्धेचा निकाल


निबंध स्पर्धा :  इंग्रजी माध्यम- प्रथम क्रमांक: संध्या टोनपे (एम. आय. टी. कॉलेज आळंदी) मराठी माध्यम - प्रथम क्रमांक: प्रणाली गाढवे (एसपीएमएम कॉलेज तळेगाव दाभाडे)


वक्तृत्व स्पर्धा - प्रथम क्रमांक: तृप्ती जाधव (टी. सी. कॉलेज बारामती)
लोकगीत गायन स्पर्धा - प्रथम क्रमांक: धनश्री शिंदे ( सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय)
लोकवाद्य वादन स्पर्धा - प्रथम क्रमांक: शिवराम सरटे (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
भित्तीपत्रक स्पर्धा - प्रथम क्रमांक: राजस पाटील (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
पथनाट्य स्पर्धा- प्रथम क्रमांक: सपना कुदळे (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
या स्पर्धेत एकूण २८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रभाकर वराडे, डॉ. विलास कर्डिले, डॉ. मेघा धर्माधिकारी, ओंकार डांगमाळी, डॉ. नाना शेजवळ, डॉ. अमित गोगावले यांनी केले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश गांधिले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेश रसाळ, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, प्रा. गौरव शेलार, प्रा. अंजु मुंडे कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी तर उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार मानले.