डीईएस पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेशाच्या 2 हजार 200 जागा

डीईएस पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेशाच्या 2 हजार 200 जागा
DES Pune University, President Dr. Rabindra Acharya

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डीईएस पुणे विद्यापीठाने (DES Pune University) इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी, सायन्स व मॅथेमॅटिक्स, ह्यूमॅनिटीज व सोशल सायन्स, डिझाईन व आर्टस आणि कॉमर्स व मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी 20224-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू (Start the admission process)केली असून विद्यापीठातर्फे भारतीय ज्ञान परंपरा, पर्यावरण आणि तंत्रज्ञान हा विद्यापीठाचा पाया असून, संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे,असे विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉ. रवींद्र आचार्य (President Dr. Rabindra Acharya)यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. 

आचार्य म्हणाले, डीईएसला शिक्षण क्षेत्रात 139 वर्षांचा वारसा असून  संस्थेची 18 महाविद्यालये आणि 36 शाळा आहेत.त्यात साठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डीईएस व्यवस्थापनाच्या वतीने पुण्यात फर्ग्युसन आणि बीएमसीसी ही महाविद्यालये चालविली जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि किफायतशीर शुल्क  यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागते. या विद्यार्थ्यांना डीईएस व्यवस्थापनाने शिक्षणासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. डीईएसचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी अनुभवी प्राध्यापक, पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देत आहे.  

खांडेकर म्हणाले, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिल्म मेकिंग, इंटेरियर डिझायनिंग व यूजर एक्सपीरियन्स, ड्रामॅटिक्स,  ॲनिमेशन, बीबीए, एमबीए बीबीएआयबी, पीजीडीबीडीए, पीजीडीबीएफ, पीजीडीटी या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2 हजार 200 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी  www.despu.edu.in  या संकेतस्थळावर संपर्क साधावा.