Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत मोठी अपडेट; गुवाहाटीमार्गे येणार मुंबईत

मणिपूरमध्ये  बहुतेक विद्यार्थी आयआयटी (IIT) आणि एनआयटीमध्ये (NIT) शिक्षण घेत असून त्यांना परत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून पावल उचलली जात आहेत.

Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत मोठी अपडेट; गुवाहाटीमार्गे येणार मुंबईत
Manipur Violence Representaive image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Manipur Violence : मणिपूर राज्यातील हिंसाचारामुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) सुमारे २२ विद्यार्थ्यांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या सर्व विद्याथ्यांना मणिपूरच्या इंफाळ येथून गुवाहाटीत हलविले जाणार असल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (22 students from Maharashtra are stuck in Manipur)

मणिपूरमध्ये  बहुतेक विद्यार्थी आयआयटी (IIT) आणि एनआयटीमध्ये (NIT) शिक्षण घेत असून त्यांना परत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून पावल उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधत त्यांना दिलासा दिला होता. विकास शर्मा व तुषार आढाव या दोन विद्यार्थ्यांशी ते बोलले. तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा : भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण अडसूळ

मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कामाला लावले होते. त्यानुसार आता मोठी अपडेट समोर आली आहे. मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विशेष विमान सायंकाळी ६.३० वाजता मुंबईत दाखल होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता हे विमान गुवाहाटी येथून मुंबईकडे प्रयाण करणार आहे. आता मणिपूरच्या इंफाळ येथून हे विद्यार्थी गुवाहाटीकडे रवाना होणार असल्याची माहिती माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या हिंसक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला जात असला तरी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही. परिणामी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2