RTE NEWS : आरटीई प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागणार; सर्व जिल्ह्यात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून आत्तापर्यंत 1 लाख 42 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of Education)शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act)(आरटीई -RTE) प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (RTE Online Admission Process)राबवली जात असून आत्तापर्यंत 1 लाख 42 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.गडचिरोली, सिंधूदूर्ग ,रत्नागिरी वगळता सर्व जिल्ह्यात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी (Online lottery for RTE admission)काढावी लागणार आहे.राज्यातील 9 हजार 196 शाळांमधील 1 लाख 4 हजार 687 जागांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.प्रवेश अर्ज करण्यास येत्या 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या आठवड्याभरात तीन लाखांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरटीई प्रवशासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून पुणे जिल्ह्यातील 966 शाळांमधील 1 हजार 596 जागांसाठी 30 हजार 196 अर्ज आले आहेत.त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 920 जागांसाठी 13 हजार 151 अर्ज आले आहेत.तर ठाणे जिल्ह्यात 11 हजार 377 जागांसाठी 11 हजार 525 अर्ज आले आहेत.त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.आरटीई प्रवेशासाठी प्रवेश क्षमेपेक्षा अधिक अर्ज आल्यास शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन लॉटरी काढली जाते.साधारणत:दरवर्षी पुण्यातील पोदार स्कूलला सर्वाधिक अर्ज येतात.त्यामुळे हजारो अर्जातून सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो.
दरम्यान, आरटीई प्रवेश मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणारे अनेक ठग पालकांना फसवतात.त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करतात.मात्र, पालकांनी कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नये,असे आवाहन वेळोवेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
-----------------------------------------------
जिल्हा निहाय प्रवेश अर्जाची स्थिती
जिल्हा उपलब्ध जागा प्राप्त अर्ज
Ahmadnagar 3023 4289
Akola 2014 2827
Amravati 2369 4208
Aurangabad 4441 8536
Bhandara 772 1244
Bid 2149 3049
Buldana 2581 2951
Chandrapur 1516 1847
Dhule 1138 1441
Gadchiroli 484 421
Gondiya 903 1789
Hingoli 805 932
Jalgaon 3033 4540
Jalna 1920 2798
Kolhapur 3006 1897
Latur 1865 2967
Mumbai 4489 4985
Mumbai 1254 --"--
Nagpur 6920 13151
Nanded 2561 4727
Nandurbar 419 454
Nashik 5268 8471
Osmanabad 1013 1354
Palghar 4773 2334
Parbhani 1564 1740
Pune 17596 30253
Raigarh 4008 4670
Ratnagiri 812 476
Sangli 1887 1257
Satara 1826 2089
Sindhudurg 293 66
Solapur 2464 2853
Thane 11377 11525
Wardha 1215 1790
Washim 953 1118
Yavatmal 1976 2893