मुलींच्या शिक्षणासाठी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग; सिंगल गर्ल चाइल्ड कोटा सुरु 

प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल, पहिला टप्पा नोंदणीचा ​​असेल आणि दुसरा कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) असेल.

मुलींच्या शिक्षणासाठी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग; सिंगल गर्ल चाइल्ड कोटा सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुलींची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून विविध स्तरातून प्रयत्न होत असताना दिल्ली विद्यापीठाने अनोखा प्रयोग सुरु केला आहे. विद्यापीठाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून पालकांना एकुलती एक मुलगी (An only daughter)असेल अशा विद्यार्थिनीसाठी आरक्षण (Reservation for girl )देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत अशा पद्धतीचे आरक्षण काही शिक्षण मंडळांकडून दिले जात होते. आता हे आरक्षण उच्च शिक्षणातही देण्याचा पायंडा दिल्ली विद्यापीठाने (University of Delhi)घातला आहे.

या उपक्रमाची माहिती देताना रजिस्ट्रार विकास गुप्ता यांनी सांगितले की, यावर्षी प्रवेश धोरणात कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, परंतु, विद्यापीठाने प्रथमच अतिरिक्त जागांचा एक भाग म्हणून सिंगल गर्ल चाइल्ड कोटा लागू केला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाने अनाथ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अतिरिक्त श्रेणी सुरू केली होती.

प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल, पहिला टप्पा नोंदणीचा ​​असेल आणि दुसरा कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) असेल. ज्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जागा वाटप केले जाईल, अशा विद्यार्थिनींच्या नोंदणीसाठी कॉमन सीट ऍलोकेशन सिस्टम CSAS वेबसाइट एक महिना खुली राहील.  CSAS द्वारे अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीला इतर जागेवर दावा करण्याचा अधिकार असणार नाही. CSAS लाँच झाल्यानंतर तीन तासांत 5 हजार 911 अर्ज प्राप्त झाले आहेत," अशी माहिती गुप्ता यांनी दिली.