गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी; शिक्षण शुल्कासह वसतिगृहाचा खर्चही राज्य शासन करणार

राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी; शिक्षण शुल्कासह वसतिगृहाचा खर्चही राज्य शासन करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील केंद्रीय शिक्षण संस्थांसह मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घट्कातील विद्यार्थ्यांनासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून (Social Justice Department) राबविली जाते. त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती राज्याचे समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoriya) यांनी दिली.

देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या /नवबौद्ध घट्कांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

सीमाभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय; भरतीत मिळेना स्थान, आपल्याच निर्णयाचा सरकारला विसर

योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोद्णी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन ट्प्यात दिले जातात.

योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ≥≥ जलद दुवे ≥≥ रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन कागदपत्रासह दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे सादर करावा लागणार आहे.

पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पुर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD