UPSC परीक्षेची तयारी करताय? बार्टीकडून मिळवा ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, असा करा अर्ज...

उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा आणि उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ करिता पात्र असावा, अशी अट आहे.

UPSC परीक्षेची तयारी करताय? बार्टीकडून मिळवा ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, असा करा अर्ज...
Barti Scheme

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (Barti) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ५० हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. (Barti Scheme)

परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच या योजनाचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा आणि उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ करिता पात्र असावा, अशी अट आहे.

ना खचला, ना हरला! ‘एमपीएससी’सह व्यवसायातील अपयश अन् अपघातानंतरही अभिषेकने सर केले यशाचे शिखर

योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीन वेळाच घेता येईल. ज्यांनी यापूर्वी योजनेचा तीन वेळा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बार्टी संस्थेने दिलेल्या लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज करावा लागणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै ही आहे.

अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र.. पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत व संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेश पत्र (Admit Card) आदी कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून bartiupsc18@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे, अशी माहिती ‘बार्टी’कडून देण्यात आली.

अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक - http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD > BARTI-UPSC- Civil Services Mains Examination 2023 Financial Assistance Scheme-Application Form

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo