राज्यसेवा 2025 पासून लेखी स्वरूपातच होणार : किशोरराजे निंबाळकर 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हीरे निवडण्याचे काम करत असतो.

राज्यसेवा 2025 पासून लेखी स्वरूपातच होणार : किशोरराजे निंबाळकर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2025 पासून राज्यसेवा परीक्षा ही लेखी स्वरूपातच घेतली  जाणार आहे.त्यात कोणतेही दुमत नाही.एकविसाव्या शतकाकडे जाताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.तसेच आयोगात कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यास त्याचा परीक्षांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे यास फारसे महत्व देण्याची आवश्यकता नाही,असेही निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टातर्फे आयोजित 'संवाद टॉपर्स मार्गदर्शन -राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोरराजे निंबाळकर बोलत होते. यावेळी अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, वास्तव कट्टयाचे किरण निंभोरे, महेश बडे उपस्थित होते.कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षेत मुलींमधून प्रथम आलेल्या पूजा वंजारी ,ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेल्या सोनल सूर्यवंशी,नववी रॅंक मिळवणारे वैभव पडवळ आणि 28वी रॅंक मिळवणारे विशाल नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.एज्युवार्ता या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते.

किशोरराजे निंबाळकर म्हणाले,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हीरे निवडण्याचे काम करत असतो.काही विद्यार्थी मागणी करतात एकच उमेदवार अनेक पदांवर नियुक्ती मिळवतो. त्यामुळे  आमच्यावर अन्याय होतो.तसेच एखादा उमेदवार वारिष्ट पद मिळवत असेल तर त्यांच्यावर निर्बंध घालू नका पण एखादा वारिष्ट पदावरून कनिष्ठ पदावर येत असेल तर त्यांच्यावर निर्बंध घाला,अशी मागणी करतात.त्यावर विचार होणे गरजेचे आहे.तसेच प्रशासनात येऊन प्रशासन खराब करू नका.जनसेवा हीच लोकसेवा आहे.हे समजून आपण काम करणे गरजचे आहे,असा सल्लाही किशोर राजे निंबाळकर यांनी दिला. 

जीवन फार सुंदर असून जे यशस्वी झाले ते पुढे जातीलच पण जे मागे राहिले. त्यांनी प्रेरणादायी पुस्तके वाचून प्लॅन बी राबवणे गरजेचे आहे. चार अटेम्प्टपर्यंत ठीक आहे; परंतु त्यापुढे प्लॅन बी तयार ठेवणे गरजेचे  आहे, असे स्पष्ट करून किशोरराजे निंबाळकर म्हणाले,जेव्हा आम्ही संगणकीय डाटा चाळतो. त्यावेळी असे लक्षात येते परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर ट्रेनिंगचा कालावधी संपतो त्यावेळी अनेकांची 45 तर काहींची 38 वर्षे पूर्ण झालेली असतात.त्यामुळे सरकारी नोकरीचे आकर्षण असले तरी स्किल इंडियासारख्या उपक्रमातून उद्योग क्षेत्रात काम केले पाहिजे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोरराजे निंबाळकर म्हणाले, आपण पुण्यात कशासाठी आलो आणि काय करतोय व कोणत्या दिशेने जाणे गरजेचे आहे,माझे आई वडील काय करतात,कोणी तरी सांगितले म्हणून मी येथे आलो,पण एक, दोन, तीन, चार अटेम्प्टपर्यंत आपलेल्या सीमित करणे करणे गरजेचे आहे.आपण कोणत्या ठिकाणाहून आलो आणि आपली पार्श्वभूमी काय यांचा फारसा फरक पडत नाही.पण आपण  खरंच या स्पर्धेत टिकणार आहोत का यांची स्वत:ला स्वत:ची परिस्थिती अंजमवता येते.सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण सर्वांनाच आहे.पण सरकारी नोकऱ्या सोप्या राहिल्या नाहीत.परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलपासून व सोशल मिडियापासून दूर रहा, असे आवाहनही त्यांनी  केले.  

शैलेश पगारिया म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळावी यासाठी आशा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजजन केले जाते. काहींची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना उचित मार्गदर्शन मिळत नाही.त्यामुळे अर्हम फाऊंडेशनतर्फे अशा कार्यक्रमातून  दिशा दाखवण्याचे काम केले जाते.तसेच चुकून अपयश आल्यास प्लॅन बी कसा तयार करावा,याबाबतही मार्गदर्शन केले जाते.

दरम्यान, सर्व टोपर्स यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या लहान मोठ्या टिप्स दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पगारिया यांनी केले.महेश बडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सूत्रसंचालन  अश्विनी टव्हारे  यांनी तर आभार प्रदर्शन राहूल शिंदे यांनी केले. 
----------------------------------------------------