ICAI चे सुधारित वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणार 

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे CA मे परीक्षेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ICAI चे सुधारित वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आज 19 मार्चला संध्याकाळपर्यंत CA मे परीक्षेचे (CA May Exam) सुधारित वेळापत्रक (Revised schedule) जाहीर करणार आहे. त्यामुळे परीक्षा कधी घेतल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन वेळापत्रक अधिकृत वेबसाइट icai.org वर उपलब्ध होईल. 

दोन दिवसांपुर्वी निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2024 दरम्यान होणाऱ्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्या अनुषंघाने परीक्षेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ICAI कडून मे 2024 च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

यापूर्वी जाहीर केलेल्या अधिकृत कॅलेंडरनुसार, फाउंडेशन कोर्सची परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून रोजी घेतली जाईल. इंटरमिजिएट गट 1 ची परीक्षा 3, 5 आणि 7 मे रोजी आणि गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 मे रोजी घेतली जाईल. अंतिम परीक्षा गट 1 साठी 2, 4 आणि 6 मे रोजी आणि गट 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे रोजी घेण्यात येईल,असे स्पष्ट करण्यात आले होते.