एमबीए सीईटीचे व्यवस्थापन ढासळले

पुण्यासह नागपूर व इतर शहरांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.तांत्रिक कारणांमुळे परीक्षा घेताना अडचणी आल्या. त्यामुळे शनिवारी हजार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.पेपर देता न आल्याने विद्यार्थ्यांनी पून्हा परीक्षा घेण्याची मागणी केली.

एमबीए सीईटीचे व्यवस्थापन ढासळले

 एमबीए सीईटीचे व्यवस्थापन ढासळल सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) एमबीए (MBA) प्रवेशासाठी घेतल्या जात असलेल्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ झाला.पुण्यासह नागपूर व इतर शहरांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.तांत्रिक कारणांमुळे परीक्षा घेताना अडचणी आल्या. त्यामुळे शनिवारी हजार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.पेपर देता न आल्याने विद्यार्थ्यांनी पून्हा परीक्षा घेण्याची मागणी केली.

   राज्यातील २६५ एमबीए इन्स्टिट्यूट मधील सुमारे ३० हजार जागांसाठी २५ व २६ मार्च रोजी राज्यात विविध ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले.मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणी करताना अडचणी येत असल्याचे दिसून आले.कसाबसा पेपर सुरू झाला पण सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.सकाळच्या सत्रातील पेपर उशिरा सुरू झाला.परिणामी दुपारच्या सत्रातील पेपरही उशीरा सुरू झाला.काही ठिकाणी सायंकाळचे साडेसात वाजले तरी पेपर सुरू झाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

    कोरोनानंतर शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत झाले आहे. एमबीए सह सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश उशिरा होत आहेत, मात्र पूर्वी प्रमाणे नियमित सत्र सुरू व्हावे; यासाठी मार्च महिन्यात सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु परीक्षेत गोंधळ झाल्याने एमबीए सीईटी पुन्हा घ्यावी लागेल, असे दिसून येत आहे.परिणामी सीईटी सेलचा कारभारामुळे यावर्षी सुध्दा शैक्षणिक सत्र पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.