संगमनेरमध्ये ३ शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू 

मृत्यू पावलेल्या तीनही मैत्रिणी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीला आली. अनुष्का सोमनाथ बढे (वय -११), सृष्टी उत्तम डापसे (वय-१३) व वैष्णवी अरुण जाधव (वय-१२) अशी मृत मुलींची नावे आहेत.

संगमनेरमध्ये ३ शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शेततळ्यात बुडाल्याने तीन शाळकरी मुलींचा मृत्यू (Death of three school girls) झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात (Mendhwan Shivar in Sangamner taluka) घडली. मृत्यू पावलेल्या तीनही मैत्रिणी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीला आली. अनुष्का सोमनाथ बढे (वय -११), सृष्टी उत्तम डापसे (वय-१३) व वैष्णवी अरुण जाधव (वय-१२) अशी मृत मुलींची नावे आहेत. या शाळकरी मुलींच्या अशा अचानक जाण्याने परिसरावर दुःखचा डोंगर कोसळला आहे. सदरच्या घटनेने प्रत्येक कुटुंबातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
शाळा सुटल्यानंतर या तिन्ही मुली घरी आल्या व जेवण केल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर पडल्या. अर्धवट असलेल्या शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्यात त्या खेळण्यासाठी उतरल्या असता तळ्यातील पाण्याचा अंदाज न असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली. या घटनेने मेंढवण परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेची संगमनेर पोलिसांकडून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

-------------------------------------

संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. मयत मुलींच्या कुटुंबाला झालेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली. 

निलेश लंके (खासदार)