अग्निपथ योजना 'सैनिक सन्मान योजना' म्हणून पुन्हा सुरू होणार?

व्हाट्सएपवर बनावट संदेश व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अग्निपथ योजनेचा आढावा घेऊन अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की, सेवेचा कालावधी 7 वर्षांपर्यंत वाढवणे, 60 टक्के कायमस्वरूपी कर्मचारी बनवणे आणि जास्त पगार देणे, ती पुन्हा सैनिक सन्मान योजना म्हणून सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही.

अग्निपथ योजना 'सैनिक सन्मान योजना'  म्हणून पुन्हा सुरू होणार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अग्निपथ योजना (Agneepath scheme) 'सैनिक सन्मान योजना' (Sainik Sanman scheme) म्हणून पुन्हा सुरू केली जाईल, असा दावा करणारे पोस्ट मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहेत. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) रविवारी (16 जून) रोजी रात्री उशिरा जारी केलेल्या फॅक्ट चेक अपडेटनुसार, ही माहिती फेक म्हणजेच खोटी असल्याचे सांगितले आहे (information is false).

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, या अपडेट्समध्ये अग्निपथ योजना 'सैनिक सन्मान योजना'  म्हणून पुन्हा सुरू केली जाईल, असा दावा केला जात आहे. अग्निवीरांची भरती आता 4 वर्षांच्या ऐवजी 7 वर्षांसाठी असेल आणि कालावधी पूर्ण झाल्यावर 60 टक्के अग्निवीरांना 25 टक्क्यांऐवजी कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, हे सर्व दावे सरकारने अफवा असल्याचे म्हटले आहे.

फॅक्ट चेक अपडेटनुसार, “ व्हाट्सएपवर बनावट संदेश व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अग्निपथ योजनेचा आढावा घेऊन अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की, सेवेचा कालावधी 7 वर्षांपर्यंत वाढवणे, 60 टक्के कायमस्वरूपी कर्मचारी बनवणे आणि जास्त पगार देणे, ती पुन्हा सैनिक सन्मान योजना म्हणून सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही.”

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एनडीए सरकारच्या शपथविधीनंतर संरक्षण मंत्रालयाच्या अग्निपथ योजनेचा आढावा घेण्याची अनेक विरोधी पक्षांकडून मागणी केली जात आहे.