सर्व विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांकडून UGC ने दहा महत्वाच्या विषयांवर मागवला अहवाल

यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी उशिरा सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना अहवाल सादर करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

सर्व विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांकडून UGC ने दहा महत्वाच्या विषयांवर मागवला अहवाल
UGC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांकडून (Higher Education Institutes) कायदेशीर, दक्षता, रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, शुल्क परत न करणे यासह १० विषयांवर अहवाल मागवले आहेत. असे अहवाल मागवण्याची ही पहिली वेळ आहे.

 

यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी उशिरा सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना अहवाल सादर करण्याचे पत्र देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या यूजीसी कौन्सिलच्या ५७२व्या बैठकीत हा प्रस्ताव आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी

 

त्याअंतर्गत सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कायदेशीर, दक्षता, खात्यांचे विवरण, यूजीसीच्या नियमांची अंमलबजावणी न करणे, कोणत्याही प्रकारची तक्रार, तक्रार निवारण यंत्रणा, लोकपाल नियुक्ती, अंतर्गत तक्रार समिती, यूजीसीच्या नियमांनुसार नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शुल्क परत न करण्याच्या धोरणाशी संबंधित बाबी आणि रॅगिंगबाबत कोणत्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि ही प्रकरणे कशी निकाली काढली याबाबत माहिती द्यावी लागेल, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, हे लवकरच समजेल. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग माहिती न पाठविणाऱ्या संस्थांवर कारवाई करणार का, असाही प्रश्न आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k