YCMOU : मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी उरले फक्त चार दिवस, ऑनलाईन प्रवेश सुरू

विद्यापीठ अधिकार मंडळाने विनाविलंब ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास दि. १ ते १५ ऑक्टोबर अशी मुदत दिली आहे. तर प्रवेश अर्जास विभागीय केंद्र मान्यता मुदत २० ऑक्टोबरपर्यंत आहे.

YCMOU : मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी उरले फक्त चार दिवस, ऑनलाईन प्रवेश सुरू
YCMOU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील (YCMOU) विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी आता केवळ चारच दिवस उरले आहेत. कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी.एड. (विशेष) आदी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार आहे. त्यासाठी दि. १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (YCMOU Admission)

 

विद्यापीठ अधिकार मंडळाने विनाविलंब ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास दि. १ ते १५ ऑक्टोबर अशी मुदत दिली आहे. तर प्रवेश अर्जास विभागीय केंद्र मान्यता मुदत २० ऑक्टोबरपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर Admission या टॅबवर Prospectus 2023-24 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.

विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी

 

प्रथम वर्ष एम.बी.ए. शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर Click here for Admission या टॅबवर Click Here for M.B.A Entrance of Academic Year 2023-24 या ठिकाणी प्रवेश परीक्षेबाबत आणि ऑनलाईन प्रवेशासाठी लिंक व माहिती उपलब्ध आहे.

 

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पूर्णपणे व चूक भरलेला प्रवेश अर्ज व प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पध्दतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k