पहिलीच ऑनलाइन टीईटी परीक्षा लांबली; कारण आले समोर...

मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन वेगवेगळ्या माध्यमांमधून परीक्षा घेण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे परीक्षा लांबणीवर पडत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पहिलीच ऑनलाइन टीईटी परीक्षा लांबली; कारण आले समोर...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात टीईटी परीक्षा (TET exam )घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.परंतु, मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन वेगवेगळ्या माध्यमांमधून परीक्षा घेण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे परीक्षा लांबणीवर पडत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. परीक्षा परिषदेने याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला असून त्यावर शासन पातळीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात तरी परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी टीईटी परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस परीक्षेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्य शासनातर्फे वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. परंतु, विविध कारणांमुळे ही परीक्षा दोन वेळा घेणे शक्य होत नाही. त्यातच परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळात टीईटीचा मोठा घोटाळा समोर आला. त्यातून शिक्षण विभागाची मोठी बदनामी झाले. त्यामुळे आता टीईटी परीक्षा सुरळीतपणे व्हावी, यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात टीईटी परीक्षा अर्ज स्वीकारून परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. परंतु, ऑनलाईन परीक्षा केंद्र उपलब्ध असणे आणि माध्यम निहाय परीक्षा घेण्यासाठी तयारी असणे गरजेचे आहे. त्यातच मराठी, हिंदी, गुजराती, कानडे, उर्दू अशा विविध भाषांवरील प्रश्न परीक्षेत विचारले जातात.तसेच तीन वेगळ्या माध्यमांमध्ये परीक्षा घेण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत.त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.