सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी; ..अन्यथा वर्षभर पाहावी लागणार वाट

शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश घेण्यात येते. या आगोदर दोन वेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षांची अंतिम तारीख आज संपणार आहे.

सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी; ..अन्यथा वर्षभर पाहावी लागणार वाट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता (Academic Year 2024-25) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (Graduate Post Graduate Course) राज्य सामाईक प्रवेश घेण्यात येते. या आगोदर दोन वेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या परीक्षांची अंतिम तारीख (Final date) आज १२ फेब्रुवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती (Detail information) परीक्षा कक्षेच्या अधिकृत संकेतस्थळ (Official website) https://www.mahacet,org वर  उपलब्ध आहे. 

दरम्यान, महा-एल.एल.बी (३ वर्ष) अर्ज नोंदणीची मुदतवाढ २१ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर एमएच नर्सिंगसाठी अर्ज करण्यास ९ फेब्रुवारीपासून सुरूवात झाला असून अंतिम मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत  देण्यात आली आहे. बाकी सर्व परीक्षेच्या नोंदणी अर्जाची मुदत 12 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 

खालील परीक्षेच्या नोंदणी अर्जाची मुदत 12 फेब्रुवारीला संपणार

१) महा-बीएड, एमएड (३ वर्षे एकात्मिक) सीईटी २०२४, २) महा-एमएड सीईटी २०२४, ३) महा-एमपी एड सीईटी २०२४, ४) महा-बी.एड (नियमित व विशेष) बी. एड इएलसीटी सीईटी २०२४, ५) महा-बी.पी.एड सीईटी २०२४, ६) महा-एमबीए/एमएमएस सीईटी २०२४, ७) महा-एमआर्च सीईटी २०२४, ८) महा-एम.एचएमसीटी  सीईटी २०२४, ९) महा-एमसीई सीईटी २०२४, १०) महा-बी.डिझाईन सीईटी २०२४, ११) महा-बी.एचएमसीटी सीईटी २०२४ या सर्व परीक्षांच्या अर्जाचा प्रारंभ १० जानेवारी २०२४ झाला होता, त्याची अंतिम तारीख आज १२ फेब्रुवारीला संपणार आहे. 

दुसऱ्यांना मागील मुदत वाढ दि तेव्हाच परीक्षा कक्षाकडून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आजची अंतिम तारिख चूकली तर पुढे वर्षभर वाट पाहावी लागले.