देशातील टॉप मेडिकल कॉलेजेस मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आघाडी

देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणारे ७० टक्यांहून अधिक विद्यार्थी बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमधील आहेत.

देशातील टॉप मेडिकल कॉलेजेस मध्ये  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आघाडी
MBBS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA ) ने १३ जून रोजी NEET परीक्षेचा निकाल जाहीर केला. यानंतर आता देशातील  एकूण ९९ हजार ७६३ एमबीबीएस (MBBS) आणि २६ हजार ९४९ बीडीएस (BDS) जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. NEET च्या राज्यनिहाय गुणवत्ता यादीच्या आकडेवारीनुसार देशातील टॉप वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थी तिसऱ्या क्रमांकावर असतील.

देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणारे ७० टक्यांहून अधिक विद्यार्थी बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमधील आहेत. या वर्षी NEET परीक्षेत ६४ हजार ५२० उमेदवारांनी ५५० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. यापैकी बहुतेक विद्यार्थी दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. यापैकी सर्वाधिक १६.८ टक्के   उमेदवार राजस्थानचे आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे १२.२ टक्के आणि महाराष्ट्रचे ८.८ टक्के इतके विद्यार्थी  आहेत. तर दिल्लीच्या सर्वाधिक ७.२ टक्के विद्यार्थांना ६२० पेक्षा अधिक गुण पटकावले आहेत.

सीईटी-सेलने खाजगी विद्यापीठांसाठी रखडवली व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया?

देशात ४०० किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या उमेदवारांची संख्या २ लाख ३० हजारांच्या आसपास  आहे, तर ५०० ते ६१९ दरम्यान गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या ४५ हजार पेक्षा जास्त आहे. यामध्ये ४०० किंवा त्याहून अधिक गुण मिळविणार्‍यांचे सर्वाधिक  १२.३ टक्के विद्यार्थी राजस्थान, त्यानंतर उत्तर प्रदेशचे ११. ८ टक्के विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील ९ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तसेच या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. पात्रता यादीत पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. राज्यातून एकूण २ लाख ७७ हजार ८१९ विद्यार्थी बसले होते यापैकी १ लाख ३१ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहे. तर उत्तर प्रदेशातून २ लाख ६७ हजार ३८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १ लाख ३९ हजार ९६१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo