NEET UG 2024 : NTA उत्तर सूची कधी प्रसिद्ध करणार? मागील ट्रेंड काय सांगतो.

गेल्या वर्षी, 4 जून रोजी, एनटीएने विद्यार्थ्यांसाठी उत्तर सूची जारी केली आणि त्यानंतर 13 जून रोजी त्यांनी निकाल जाहीर केला. या वर्षी मात्र NTA मेच्या अखेरीस किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी निकाल जाहीर करेल. 

NEET UG 2024 : NTA उत्तर सूची  कधी प्रसिद्ध करणार? मागील ट्रेंड काय सांगतो.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 5 मे रोजी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, अंडरग्रेजुएट (NEET UG) 2024 चे आयोजन केले होते. तेव्हापासून, विद्यार्थी NEET UG च्या उत्तर सूची ( NEET UG  answer key) ची वाट पाहत आहेत. NTA ने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख दिलेली नाही. मात्र, मागील काही वर्षातील ट्रेंड काय सांगतो, त्यावर एक नजर टाकू. 

गेल्या वर्षी ७ मे रोजी NEET UG परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 4 जून रोजी NTA ने विद्यार्थ्यांसाठी उत्तर सूची प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 13 जून रोजी  निकाल जाहीर केला होता. यंदा ५ मे रोजी परीक्षा घेतली गेली.  त्यामुळे  NTA जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थात लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी निकाल जाहीर होण्याची अशी शक्यता आहे. 

NEET UG ची उत्तर सूची प्रकाशित प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइट, exams.nta.ac.in/NEET/ वरून डाउनलोड करु शकता. NEET UG  प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या उत्तर सूची ला विद्यार्थ्यांकडून निर्धारित मुदतीत आव्हान दिले जाऊ शकते. तज्ञ समितीशी सल्लामसलत केल्यानंतर, NTA नंतर अंतिम उत्तर सूची प्रसिध्द केली जाईल. ज्याच्या आधारावर निकाल तयार करून घोषित केला जाईल.

NEET UG 2024 उत्तर सूची ला 200 रुपये शुल्क भरून आव्हान दिले जाऊ शकते. दिलेल्या वेळेत प्रतिसादावर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना आवश्यक ती रक्कम भरावी लागेल. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की NEET UG अंतिम उत्तर सूची प्रसिध्द केल्यानंतर कोणत्याही समस्या आणि चौकशीचे निराकरण केले जाणार नाही.