यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांचा कट ऑफ किती असेल? मागील वर्षीचा कट ऑफ पहा

पुणे-मुंबईतील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीचे सीईटी परीक्षेतील गुण महत्वाचे आहेत.

यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांचा कट ऑफ किती असेल? मागील वर्षीचा कट ऑफ पहा
MHT CET Cut Off 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अभियांत्रिकी (Engineering), कृषी (Agriculture) आणि औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी (MHT CET) परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे.  निकालाची वाट पाहत असतानाच आपल्याला इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी आवश्यक गुण मिळतील का याचीही काळजी विद्यार्थ्यांना सतावत आहे. महाविद्यालयांचा कटऑफ पार करू शकू का, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

पुणे-मुंबईतील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीचे सीईटी परीक्षेतील गुण महत्वाचे आहेत. याविषयी 'एज्युवार्ता'शी बोलतांना 'डिपर'चे संस्थापक आणि प्रवेश परीक्षा तज्ज्ञ हरीश बुटले (Harish Butle) म्हणाले, मागील वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाच्या CET चे कटऑफ नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये ९७ ते ९७. ८ टक्यांच्या दरम्यान होते. यावर्षी यामध्ये फार फार तर ०.५ गुणांचा फरक पडू शकतो, अशी शक्यता आहे.

दहावी-बारावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार

CET मध्ये 'डेटा सायन्स' आणि 'आर्टिफिशिअल इंटिलिजिन्स' या नवीन विषयांचा समावेश झाला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व्यतिरिक्त या दोन विषयांचे कटऑफ देखील ९७ टक्यांच्या आसपास असेल. याशिवाय मेकॅनिकल, इलेक्टॉनिक इंजिनिअरिंग आदी विषयांचे कटऑफ ९७ टक्यांपेक्षा कमी असेल. नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांना CET मध्ये किमान ९७ टक्के गुण मिळवावे लागतील, असेही बुटले यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षीचा महाविद्यालयनिहाय कट ऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://fe2022.mahacet.org/ViewPublicDocument?MenuId=2449

सीईटीसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पीसीएम ग्रुप मध्ये तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर पीसीबी ग्रुप मध्ये  दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo