QS विद्यापीठ क्रमवारीत पुण्यातील सिंबायोसिस अव्वल; पुणे विद्यापीठाची घसरण

QS विद्यापीठ क्रमवारीत पुण्यातील सिंबायोसिस अव्वल; पुणे विद्यापीठाची घसरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शासकीय विद्यापीठांच्या तुलनेत खासगी व अभिमत विद्यापीठांच्या क्रमवारीत गेल्या काही वर्षापासून घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये (QS World University Rankings)ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University)घसरण झाली आहे. मागील वर्षी 173 व्या क्रमांकावर असलेले पुणे विद्यापीठ या वर्षी 207 वर घसरले आहे. त्या तुलनेत सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड) युनिव्हर्सिटीने (Symbiosis International University)२०० वे स्थान पटकावले आहे.एनआयआरएफ रँकिंगमध्ये सुद्धा सिंबायोसिसच्या क्रमवारीत वाढ झाल्याचे दिसून आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.त्यानंतर आता क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सुध्दा विद्यापीठाची घसरण झाली असल्याचे समोर आले आहे. पुणे विद्यापीठाने २०२४ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २१० वा क्रमांक मिळवला होता. मात्र, २०२५ च्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली होती. विद्यापीठात १७३ व्या क्रमांकापर्यंत पोहचले होते.परंतु, या वर्षी पुन्हा विद्यापीठाची क्रमवारी 34 ने घसरली. त्यामुळे पुणे विद्यापीठ 2026च्या क्रमवारीत 207 व्या स्थानावर पोहचले आहे.

सिम्बायोसिसने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये एकूण ५२.२ गुण मिळवले आहेत. पीएचडी पॅरामीटरसह स्टाफमध्ये ५७.३ आणि फॅकल्टी स्टुडंट रेशो पॅरामीटरमध्ये सिंबायोसिसला ४७.६ गुण मिळाले आहेत. विद्यापीठाने शैक्षणिक प्रतिष्ठेत ३६.३, फॅकल्टी प्रति पेपर्समध्ये १२.२ आणि पेपर पॅरामीटर्समध्ये ८.९ गुण मिळवले आहेत. सिम्बायोसिसमध्ये ८९ टक्के देशांतर्गत विद्यार्थी आणि ११ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते, जे या स्पर्धेत सहभागी असलेल्या इतर शहर-आधारित विद्यापीठांपेक्षा खूपच जास्त होते. सिम्बायोसिसने २०२५ च्या रँकिंगमध्ये २१६ वा आणि २०२४ च्या रँकिंगमध्ये २६१-२७० चा रँक मिळवला होता.

पुण्यातील विद्यापीठांमध्ये, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू), पिंपरी, पुणे (विद्यापीठ अभिमत) ५६९ व्या क्रमांकावर आहे तर २०२५ च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ ८५१-९०० च्या श्रेणीत आहे.त्यामुळे खासगी व अभिमत विद्यापीठे क्यूएस व एनआयआरएफ रँकिंग सुधारण्यासाठी अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणवत्तेच्या जोरावर गेल्या काही वर्षांपासून आपली गुणवत्ता टिकून ठेवली होती.मात्र, अलीकडच्या काळात विद्यापीठाची क्रमवारी कमी होत चालली आहे.त्यामुळे या क्रमवारीत वाढ करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाला उपाय योजना कराव्या लागणार आहेत.सिंबायोसिस व डी. वाय. पाटील विद्यापीठ रँकिंगमध्ये विद्यापीठाला आव्हान देत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची NIRF रँकिंग मधील ओव्हरऑल व युनिव्हर्सिटी रँकिंगची स्थिती

वर्ष         ओव्हरऑल       युनिव्हर्सिटी

2017       18                     10

2018        16                    09

2019        17                    10

2020        19                    09

2021        20                    11

2022       25                     12

2023       35                     19

2024       37                      23

2025       91                      56