सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसणाऱ्यांना मिळणार नाही अमेरिका व्हिसा; ट्रंप सरकारचा अजब निर्णय
परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही परदेशी विद्यार्थ्याचे सोशल मीडिया प्रोफाइल अत्यंत काटेकोरपणे तपासण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या कॉन्सुलर अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 'ऑनलाइन उपस्थिती नसल्यास व्हिसा अर्ज नाकारला जाऊ शकतो.'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही परदेशी विद्यार्थ्याचे सोशल मीडिया प्रोफाइल अत्यंत काटेकोरपणे तपासण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या कॉन्सुलर अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 'ऑनलाइन उपस्थिती नसल्यास व्हिसा अर्ज नाकारला जाऊ शकतो.' तथापि, हा आदेश सध्या हार्वर्ड विद्यापीठासाठी जारी करण्यात आला आहे. परंतु अनेकांना भीती आहे की अमेरिकेतील अनेक उच्च संस्था त्याच्या कक्षेत येऊ शकतात.
हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प सरकारमध्ये सध्या तनावाचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मात्र रुबियो यांनी ही शक्यता फेटाळत लावली असून पुढे म्हटले आहे की, 'ही प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोका असलेल्या अर्जदारांना वगळण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून काम करेल.'. ट्रम्प सरकारने आधीच हार्वर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी घातली होती. एका संघीय न्यायालयाने सध्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.