आरोग्य विभागात १ हजार ४४० पदांची भरती प्रक्रिया सुरू
समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) भरावयाचे रिक्त पदाकरीता उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बारावी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागात (Health Department) भरती प्रक्रिया जाहीर (Recruitment process announced) करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत आरोग्य अधिकारी (गट-अ) या पदांच्या १ हजार ४४० जागा (1,440 vacancies for Health Officer posts) भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) रिक्त पदांची भरती करीता प्रस्तृत जाहीरातीत नमुद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) भरावयाचे रिक्त पदाकरीता उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करावे, ऑनलाईन भरलेल्या अर्जा व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
येथे करता येईल नोंदणी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदाची पदभरती करण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात /अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्जाकरीता https://nhm.maharashtra.gov.in वर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल, सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करुन घ्यावयाची जबाबदारी उमेदवाराची असल्याचे सांगण्यात आले आहे.

eduvarta@gmail.com