इंजिनिअर तरुणांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीत भरती सुरू
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 25 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांच्या वयाची गणना 1 ऑक्टोबर 2025 तारीखेच्या आधारे केली जाईल. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयोमयदित सूट देण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) कडून प्रोबेशनरी इंजिनिअर पदाच्या एकूण 340 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर (Recruitment announced for 340 vacant posts) करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू (Online process started) झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरू (Applications can be submitted until November 14) शकतात.
डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त भार
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्यूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्यूनिकेशन/ कम्यूनिकेशन / टेलीकम्यूनिकेशन/ मॅकेनिकल / कंप्यूटर सायन्स/कंप्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अशा संबंधित विषयांमध्ये B.E किंवा B.Tech तसेच, बीएससी अथवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मध्ये फर्स्ट क्लासची डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, संबंधित विषयांमध्ये AMIE, AMIETE, GIETE मध्ये फर्स्ट क्लास असणारे उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील. याव्यतिरिक्त, या विषयांमध्ये केवळ उत्तीर्ण असलेले एससी/एसटी प्रवर्गातील आणि अपंग उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 25 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांच्या वयाची गणना 1 ऑक्टोबर 2025 तारीखेच्या आधारे केली जाईल. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयोमयदित सूट देण्यात येणार आहे. कंप्यूटर आधारित परीक्षेच्या आधारे उमेदवारांची संबंधित पर्दासाठी निवड केली जाईल. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल आणि एसटी, एससी प्रवर्गातील तसेच अपंग उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात येणार आहे.
eduvarta@gmail.com