सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण;निवास,भोजनाची सोय
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७ सप्टेंबरपर्यंत मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Indian Army, Navy and Air Force)अधिकारी पदावर भरती (Recruitment to the post of officer)होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेच्या (SSB exam)तयारीकरिता येत्या २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७ सप्टेंबरपर्यंत मुलाखतीस हजर राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एसएसबी -६२ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुद्रित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलीली असावी. उमेदवाराने कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अॅकडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'सी' प्रमाणपत्र 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये उर्तीर्ण झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीकरिता शिफारस केलेली असावी. टेक्नीकल सॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल वर व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.