परदेशी नोकरी घालवणाऱ्या मॅडर्न शिक्षण संस्थेची चौकशी करा; युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

आवश्यक कागदपत्र तपासण्यास नकार दिल्यामुळे एका होतकरू आणि परिश्रम करणाऱ्या तरुणाच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांनी केला आहे. विद्यार्थ्याकडून झालेल्या पत्रव्यवहाराची तसेच महाविद्यालयाकडून आवश्यक पत्र व्यवहार करण्यात विलंब झाल्याने आणि त्यामुळे विद्यार्थ्याला नोकरीवर पाणी सोडावे लागले, या सर्व घटनांची चौकशी होणे गरजेचे आहे.

परदेशी नोकरी घालवणाऱ्या मॅडर्न शिक्षण संस्थेची चौकशी करा; युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन महाविद्यालयाच्या (Progressive Education Society's Modern College) प्राचार्य पदी बेकायदेशीरपणे नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. निवेदिता एकबोटे (Dr. Nivedita Ekbote) यांनी व त्यांच्या उपप्राचार्यांनी एका विद्यार्थ्याची लंडन येथील नोकरी घालवली आहे. आवश्यक कागदपत्र तपासण्यास नकार दिल्यामुळे एका होतकरू आणि परिश्रम करणाऱ्या तरुणाच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांनी केला आहे. विद्यार्थ्याकडून झालेल्या पत्रव्यवहाराची तसेच महाविद्यालयाकडून आवश्यक पत्र व्यवहार करण्यात विलंब झाल्याने आणि त्यामुळे विद्यार्थ्याला नोकरीवर पाणी सोडावे लागले, या सर्व घटनांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विद्यापीठाने व राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने (Office of the Director of Higher Education) या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी (High-level inquiry demanded) करावी, अशी मागणी युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे. 

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

युवासेनेने निवेदिता एकबोटे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. प्राचार्य ही व्यक्ती विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विचार करणारी असावी. मात्र, येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले आहे. ही निंदनीय बाब आहे. हा मुद्दा केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला आहे. ही चौकशी सुरू असताना त्यात प्राचार्य व उप प्राचार्य यांच्याकडून कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी संबंधित व्यक्तींना चौकशी कालावधीपर्यंत पदावरून दूर करावे. तसेच संबंधित विद्यार्थ्याला समक्ष बोलावून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी म्हटले आहे.

बेकायदेशीरपणे शासकीय पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे का? शासकीय पदावर पात्र व्यक्ती ऐवजी संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्याची प्राचार्य म्हणून नियुक्ती करणे कितपत योग्य आहे? त्यामुळे या सर्व प्रक्रिया दोषी असणाऱ्या विद्यापीठातील अधिकारी शासनाचे अधिकारी यांचीही चौकशी व्हायला हवी. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचे या घटनांमुळे बदनामी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सखोल चौकशी करावी अन्यथा, युवा सेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.