लागा कामाला! राज्यात १७०० तलाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तलाठ्यांची १ हजार ७०० पदे रिक्त होती. ही सर्व शंभर टक्के पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला असूनव डिसेंबर अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया अधिकृतपणे चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात १ हजार ७०० हून अधिक तलाठी पदाच्या (1,700 Talathi posts) भरती प्रक्रियेला सुरूवात (Recruitment process begins) झाली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा (Reserved seats in recruitment) देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठ्यांची ही पदे भरली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सोमवारी होणार सुरू
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तलाठ्यांची १ हजार ७०० पदे रिक्त होती. ही सर्व शंभर टक्के पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला असून डिसेंबर अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया अधिकृतपणे चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या आधी (२०२३ मध्ये) पार पडलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले होते. तसेच, नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदांवरूनही समस्या निर्माण झाली होती. यावर न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे. मात्र, शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक विद्यार्थी न्यायालयाच्या परीक्षेत आहेत.
महसूल सेवकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने, त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभवानुसार अधिक गुण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.
eduvarta@gmail.com