QS World Ranking'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण; मुंबई 245 व्या क्रमांकावर
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार 173 व्या स्थानावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 207 क्रमांकावर घसरण झाली आहे. तर आयआयटी-बॉम्बे, जी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेहमीच सर्वात उच्च स्थानावर राहिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची (QS World University Rankings) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या रँकिंग मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार 173 व्या स्थानावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 207 क्रमांकावर घसरण (Pune University drops to 207th position) झाली आहे.काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या NIRF रँकिंगमध्ये विद्यापीठाची घसरण झाली होती.त्यानंतर आता क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विद्यापीठाची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे ही निश्चितच विद्यापीठासाठी चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे.
आयआयटी-बॉम्बे, जी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेहमीच सर्वात उच्च स्थानावर राहिली. मात्र, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने आशिया 2026 साठीच्या क्रमवारीची घोषणा करताच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेची रँक 48 वरून 71 वर घसरली आहे. मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवरील पहिला क्रमांक आयआयटी-दिल्लीकडे गेल्यानंतर, यावर्षी जून महिन्यातही आयआयटी-बॉम्बेने जागतिक क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - विद्यापीठातील 111 प्राध्यापक पदासाठी नव्याने मागवले अर्ज; 8 नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू
महाराष्ट्रातील इतर उच्च शिक्षण संस्थांपैकी मुंबई विद्यापीठाने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये आपले 245 वे स्थान कायम राखले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (एसपीपीयू) 173 वरून 207 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) ची देखील घसरण झाली असून, ती 336 वरून 421 व्या स्थानी गेली आहे.
सर्वच निकषांमध्ये आपले प्रदर्शन सुधारले
यूके-स्थित क्रमवारी संस्था क्वाक्वेरेली सायमंड्स यांनी गोळा केलेल्या आकडेवारीच्या सविस्तर विश्लेषणानुसार, आयआयटी बॉम्बेने मागील वर्षाच्या आशियाई क्रमवारीच्या तुलनेत जवळपास सर्वच निकषांमध्ये आपले प्रदर्शन सुधारले आहे. तरीसुद्धा, एकूण क्रमवारीत संस्थेने तब्बल 23 स्थानांची घसरण झाली आहे. प्रत्येक शिक्षकामागील संशोधन, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर यांसारख्या पारंपरिक निकषांपासून ते आंतरराष्ट्रीय शिक्षकवर्ग, परदेशी विद्यार्थी देवाणघेवाण आणि यांसारख्या नव्या निकषांपर्यंत सर्व बाबतीत संस्थेने आपले गुण वाढवले आहेत. शैक्षणिक प्रतिष्ठेच्या बाबतीत मात्र आयआयटी बॉम्बेची काही गुणांची घसरण झाली आहे.
eduvarta@gmail.com