अमेरिकेची  विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी ; शेकडो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगनीला 

परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एका आदेशात म्हटले आहे की सर्व दूतावासांनी पुढील सूचना येईपर्यंत  विद्यार्थी किंवा एक्सचेंज व्हिजिटर व्हिसासाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करू नयेत. परंतु यामागील कारण अधिकृतपणे सांगितले गेले नाही.

अमेरिकेची  विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी ; शेकडो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगनीला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


तुम्ही या वर्षी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा विचार करत आहात का? तुम्हाला अॅडमिशन लेटर  मिळाले आहे आणि आता तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करावा लागेल का? जर तुम्ही या दोन श्रेणींपैकी एका श्रेणीत येत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेने जगभरातील त्यांच्या दूतावासांना नवीन विद्यार्थी व्हिसासाठी मुलाखती शेड्यूल करण्यास बंदी घातली आहे. (america has banned its interviews for new student visas.) याचा अर्थ असा की तुम्ही विद्यार्थी व्हिसा मिळविण्यासाठी दूतावासात अपॉइंटमेंट बुक करू शकणार नाही.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. अमेरिकेत जाणारे विद्यार्थी अपॉइंटमेंट कशी मिळेल याची चिंता करत आहेत. कारण अपॉइंटमेंट शिवाय व्हिसा मिळणार नाही. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एका आदेशात म्हटले आहे की सर्व दूतावासांनी पुढील सूचना येईपर्यंत  विद्यार्थी किंवा एक्सचेंज व्हिजिटर व्हिसासाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करू नयेत. परंतु यामागील कारण अधिकृतपणे सांगितले गेले नाही.

ज्यांनी आधीच अपॉइंटमेंट बुक केल्या आहेत त्यांनी काय करावे?

मात्र, आता ज्यांनी आधीच अपॉइंटमेंट बुक केल्या आहेत त्यांना व्हिसा मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही का? त्यांचे काय होणार आहे? याबाबत  परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की नवीन बुकिंग शेड्यूल करू नयेत. परंतु ज्यांनी आधीच अपॉइंटमेंट बुक केली आहे ते व्हिसा मुलाखती देऊ शकतात आणि विद्यार्थी व्हिसा मिळवू शकतात. 

 गेल्या वर्षी अमेरिकेतील कॉलेज कॅम्पसमध्ये पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने घडली. यामध्ये  परदेशी विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता. त्यानंतर अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांवर निर्बंध आणले जात आहे.