धक्कादायक ; अमेरिकेतील विमानतळावर भारतीय विद्यार्थ्याला गुन्हेगारासारखी वागणूक
भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, न्यूयॉर्क पोलिसांनी विद्यार्थ्याला बेड्या लावल्या आहेत. कुणाल जैन यांनी व्हिडिओ शेअर करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही टॅग केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात जाचक अटी आणि धोरणे अमलात आणली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. अशातच आता अमेरिकेतून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला गुन्हेगारासारखे वागवले गेले. (Indian student treated like a criminal at US airport) त्याला जमिनीवर झोपवण्यात आले आणि त्याला बेड्या लावण्यात आल्या. या घटनेदरम्यान तो रडत राहिला. तो विद्यार्थी अधिकाऱ्यांना सांगत राहिला की तो वेडा नाही. त्यानंतरही त्याला गुन्हेगारासारखे वागवले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, न्यूयॉर्क विमानतळावर पोलिसांनी विद्यार्थ्याला बेड्या लावल्या आहेत. कुणाल जैन यांनी व्हिडिओ शेअर करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही टॅग केले. जैन ज्या विमानाने प्रवास करणार होते, त्याच विमानाने तो विद्यार्थी देखील प्रवास करणार होता. पण त्या आधीच विमानतळावरील पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. व्हिडिओ समोर आल्यानंतर, भारतीय दूतावासानेही यावर एक निवेदन जारी केले आहे. लोकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.
कुणाल जैनने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काल रात्री न्यूयॉर्क विमानतळावरून एका तरुण भारतीय विद्यार्थ्याला हद्दपार होताना पाहिले. त्याला हातकड्या घालून, गुन्हेगारासारखे वागवले जात होते. तो त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करत आला होता, तो कुणालाही नुकसान पोहोचवत नव्हता. एक अनिवासी भारतीय म्हणून, मला असहाय्य आणि हृदयभंग झाल्यासारखे वाटले. ही एक मानवी शोकांतिका आहे." जैन यांनी पोस्टमध्ये अमेरिकेतील भारतीय दूतावासाला देखील टॅग केले आहे.
हा गरीब विद्यार्थी हरियाणवी भाषेत बोलत होता. तो "मैं पागल नहीं हूं, ये लोग मुझे पागल प्रतिद करने में लागे हुए हे" असे म्हणत होता, असेही जैन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, "ही मुले सकाळी व्हिसा घेऊन फ्लाइटमधून उतरतात. काही कारणास्तव, तिथल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्यांच्या येण्याचे कारण समजत नाही आणि त्यांना हातपाय बांधून संध्याकाळच्या फ्लाइटमधून गुन्हेगारांसारखे परत पाठवले जाते. दररोज अशा ३-४ घटना घडत आहेत."
भारतीय दूतावासाने काय म्हटले?
न्यूवॉर्क विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत भारतीय दूतावासाचे निवेदनही समोर आले आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, "आम्ही या प्रकरणाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. आम्ही सोशल मीडियावर अशा पोस्ट पाहिल्या आहेत ज्यात दावा केला आहे की एका भारतीय नागरिकाला नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडचणी येत आहेत. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत."
दुसरीकडे, व्हिडिओ समोर आल्यापासून, अमेरिकेत भारतीयांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल लोक संतापले आहेत. कुणाल जैनच्या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट केल्या. काही लोकांनी म्हटले की जेव्हा कुणालने ही घटना घडताना पाहिली तेव्हा त्याने थांबून विद्यार्थ्याला मदत करायला हवी होती. एका वापरकर्त्याने म्हटले, "कथा लिहिणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला इतके काळजी होती तर तुम्ही त्याला का सोडवले नाही?"
इतरांनी प्रश्न विचारला की भारतीय विद्यार्थी भरमसाठ फी आणि कमी सुरक्षितता असूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत का जातात. एका व्यक्तीने लिहिले, "अमेरिका आता तुमचा स्वप्नांचा देश राहिलेला नाही. तो तुमच्यासाठी नरक बनला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचा गंभीरपणे पुनर्विचार करावा.
अमेरिकेतील विमानतळावर भारतीय विद्यार्थ्याला गुन्हेगारासारखी वागणूक !
— Edu Varta (@EduvartaNews) June 10, 2025
सविस्तर बातमी -https://t.co/BRMRtRn0Le#portblair #airport #insianstudent #studentssafety pic.twitter.com/YuGcYiB43j
eduvarta@gmail.com