पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून राजेश पांडे यांची ‘मतदार नोंदणी प्रमुख’ पदी नियुक्ती

"सलग तिसऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडीन.”

पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून राजेश पांडे यांची ‘मतदार नोंदणी प्रमुख’ पदी नियुक्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. याचबरोबर आमदार संजय केनेकर यांची छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी, तर प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सुधाकर कोहळे यांची नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश पांडे म्हणाले, “सलग तिसऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडीन.”

पांडे म्हणाले, “पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरांना मतदानाचा हक्क आहे. १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक झाली होती. दर सहा वर्षांनी ही निवडणूक होते. या वेळी संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आम्ही अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी सुनिश्चित करू.”

पुणे पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या पदवीधर मतदारसंघांपैकी एक मानला जातो. भाजपने यापूर्वीही या मतदारसंघात प्रभावी संघटनात्मक बांधणी करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देणे हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे.