NEET MDS 2025 साठी आजपासून करता येणार अर्ज

उमेदवारांनी सादर केलेली माहिती एनईईटी-एमडीएस-२०२५ महाराष्ट्र राज्य तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरली जाईल.

NEET MDS 2025 साठी आजपासून करता येणार अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकार/महामंडळ/राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानित/विनाअनुदानित खाजगी/अल्पसंख्याक (Government/Corporation/State & Central Govt. Aided/ Unaided Private/Minority) दंत संस्थांमध्ये (Dental Institutions) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य कोट्यातील जागांसाठी पदव्युत्तर दंत (MDS) अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया (Registration process) आज दि. २८ जूनपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करू शकतात.

एनईईटी-एमडीएस-२०२५ परीक्षेला बसलेल्या आणि महाराष्ट्र राज्यात असलेल्या राज्य सरकार/महामंडळ/राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानित/विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर नोंदणी/माहिती ऑनलाइन सादर करावी असेही सांगण्यात आले आहेत.

दरम्यान, उमेदवारांनी सादर केलेली माहिती एनईईटी-एमडीएस-२०२५ महाराष्ट्र राज्य तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरली जाईल. ही माहिती सादर करणाऱ्या आणि यशस्वीरित्या पैसे भरणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांचा (एनआरआय उमेदवारांसह) फक्त महाराष्ट्र राज्यात असलेल्या उपलब्ध जागांवर प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे.

उमेदवारांनी माहिती पुस्तिका वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता पडताळावी. अर्जात योग्य माहिती देणे ही उमेदवाराची एकमेव जबाबदारी आहे. उमेदवाराने भरलेली कोणतीही चुकीची माहिती प्रवेश रद्द करू शकते. उमेदवाराच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी एनआरआय उमेदवाराने ०२/०७/२०२५ पूर्वी परदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करावी असेही सीईटी सेलने सांगितले आहे.

असे असेल संपूर्ण वेळापत्रक