शिक्षक पदभरती लांबणार; आधार पडताळणीसाठी नवी डेडलाईन

शिक्षण विभागाकडून १५ मेपर्यंत आधार पडताळणीसाठी अंतिम मुदत दिली होती. पण अनेक शाळांचे ९५ टक्केही काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

शिक्षक पदभरती लांबणार; आधार पडताळणीसाठी नवी डेडलाईन
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांसाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे (Aadhar Updation) काम सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लाखो विद्यार्थ्यांची (Students) आधार पडताळणी होऊ शकलेली नाही. शिक्षण विभागाकडून (Education Department) सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. परिणामी, त्यावर आधारीत असलेली संचमान्यताही रखडत चालली असून शिक्षण पदभरती (Teachers Recruitment) लांबणीवर पडली आहे.

शिक्षण विभागाकडून १५ मेपर्यंत आधार पडताळणीसाठी अंतिम मुदत दिली होती. पण अनेक शाळांचे ९५ टक्केही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. शंभर टक्के काम झालेल्या शाळांच्या अंतरिम संचमान्यतेचे काम सुरू आहे. पण कामे अपुर्ण असलेल्या शाळांची संचमान्यता रखडली असल्याने त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होत आहे. आता शिक्षण विभागाने पडताळणीच्या कामासाठी १५ जूनही अंतिम मुदत दिली आहे.

शिक्षकांच्या वारंवार बदल्यांची प्रथा थांबणार; स्थानिक भागातच नोकरीला प्राधान्य

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या उपस्थितीत पुण्यात मागील आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमुध्ये आधार पडताळणीवर चर्चा झाली. त्यानुसार आधार पडताळणीसाठी अंतिम मुदत १५ जून करण्यात आली आहे. त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता अंतिम करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२२ ही तारीख गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करताना संस्थेने काही तफावत निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्याने शहानिशा करून निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, अंतिम झालेल्या संच मान्यतांतील मंजूर पदांनुसार पदभरतीची कार्यवाही केली जाणार आहे. ज्या ज्या व्यवस्थापनांकडून संच मान्यता २०२२-२३ ची कार्यवाही अंतिम होईल, त्या त्या व्यवस्थापनांनी त्यांच्याकडील शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचे जाहिरात देणे आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

दहावी-बारावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार

संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदु नामावली प्रमाणित केली जाईल. शिक्षकांच्या रिक्त पदांची पहिल्या तिमाहीसाठी पोर्टलवर नोंद करावी लागेल. पहिल्या तिमाहीसाठी प्राप्त जाहिरातीनुसार, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे इत्यादी बाबी ऑगस्टपर्यंत पोर्टलमार्फत करण्याचे नियोजित आहे. दरम्यानच्या काळात दुसऱ्या तिमाहीकरीता शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद केली जाईल.

आधार पडताळणीची सद्यस्थिती (सरल पोर्टलनुसार) -

शाळेकडील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले एकूण विद्यार्थी – २,१३,१३,२७५

आधार कार्डची माहिती शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेले – ३,५५,७२४

आधार कार्डची माहिती शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेले – २,०९,५७,५५१

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले – १,९९,९७,६९२

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेले – १,८६,८५,४२८

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (Invalid) आढळून आले – १३,१२,२६४

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo