करिअर कट्टा उपक्रमातून विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाचा लुटीला पाठिंबा?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्यास नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र,ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा नाही,अशा विद्यार्थ्यांचे सुध्दा शुल्क प्रशिक्षण देण्याऱ्या संबंधित संस्थेच्या घशात घातले जात आहे.ही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट असून शासनाने याबाबतचे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विद्यापीठांमधील व संलग्न महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करिअर कट्टा (career katta) या उपक्रमांतर्गत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रत्येक वर्षासाठी ३६५ रुपये शुल्क आकारले जात आहेत.याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिध्द केले असून विद्यापीठाच्या मान्यतेने त्यास राबावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)व्यवस्थापन परिषदेने त्यास नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र,ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा नाही,अशा विद्यार्थ्यांचे सुध्दा शुल्क प्रशिक्षण देण्याऱ्या संबंधित संस्थेच्या घशात घातले जात आहे.ही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट असून शासनाने याबाबतचे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे,अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने राज्याचे प्र. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar)यांना देण्यात आले.
उच्च शिक्षण विभागाकडून दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी करिअर कट्टा विषयक परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले. या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रांतील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायित विद्यापीठांना करिअर कट्टा या उपक्रमाचे शुल्क विद्यापीठ शुल्करचने अंतर्गत विविध गुणदर्शन व उपक्रम शुल्क (Extra-curricular वा activity fees) या शीर्षकांतर्गत अंतर्भूत करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. याला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंबंधीच्या अंमलबजावणीचे देखील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र, ३६५ रूपये अतिरिक्त शुल्कवाढीला विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांचा विरोध आहे.तसेच विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हे परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. देवळाणकर यांच्याकडे केली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे, अभिषेक शेलकर,आदिनाथ जावीर, सोमठाणे गावचे उपसरपंच व समाजसेवक आकाश दौंडे आदी उपस्थित होते.
-------------------------
शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीनंतर त्यांच्याशी चर्चा करताना डॉ. देवळाणकर म्हणाले, संबंधित परिपत्रक हे कुणालाही अनिवार्य नाही. हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. त्यावर शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, सर्व विद्यापीठांनी तशा स्वरूपाचे परिपत्रक प्रसिद्ध करावे.कोणत्याही विद्यापीठाने आणि संलग्नित महाविद्यालयांने विद्यार्थींना पैसे भरण्यासाठी बंधनकारक करू नये. तसे होत असेल तर विद्यार्थीनी त्यास तात्काळ विरोध करावा व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीशी याबाबत संपर्क साधावा.
- राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
__________
eduvarta@gmail.com