मंत्रीमंडळाचा शपतविधी झाला;आता शिक्षणमंत्री पद कोणाला ?
शिक्षणमंत्री पद पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला आले तर शालेय शिक्षणमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या मंत्री मंडळाचा शपतविधी रविवारी मोठ्या थाटात पार पडला.मात्र,आता खातेवाटपामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री (Minister of School Education)पद आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education)पद कोणाच्या वाट्याला येणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.त्यात राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Former School Education Minister Deepak Kesarkar)यांचा मंत्रीपदाच्या यादीतून पत्ता कट झाला आहे.त्यामुळे शिक्षणमंत्री पद पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला आले तर शालेय शिक्षणमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्याचकडे दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री पदीची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आली.शालेय गणवेश वाटपात झालेल्या दिरंगाईमुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली.मात्र,आता मंत्रीमंडळातून केसरकर यांचा पत्ता कट झाला आहे.परंतु,मागील काही खाते पुन्हा त्याचा पक्षाकडे राहिली तर शिवसेनेच्या वाट्याला शालेय शिक्षण मंत्रीपद मिळू शकते. त्यात माजी मंत्री शंभूराज देसाई किंवा संजय शिरसाट यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.त्याचप्रमाणे दादा भुसे आणि प्रकाश आबिटकर यांचीही नावे चर्चेत आहेत.परंतु, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी काही कालावधी शालये शिक्षणमंत्री पदाची जबादारी सांभाळली आहे.त्यामुळे काही फेर बदल झाले तर शेलार यांनाही शालेय शिक्षण मंत्री म्हणून पुन्हा काम करण्याची संधी मिळू शकते,अशी चर्चा आहे.
देशासह राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे.माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.परंतु, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सुध्दा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.त्यामुळे सामंत यांच्यासाठी शिवसेनेकडून उच्च शिक्षण मंत्री पदावर दावा सांगितला जाऊ शकतो.तसेच अतुल सावे यांनाही हे मंत्री पद मिळू शकते,असे बोलले जात आहे. मात्र,मुख्यमंत्री कोणाकडे कोणते खाते देतात, हे जाहीर झाल्यानंतरच या चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे.