प्रियदर्शनी स्कूलचा 'एक मुट्ठी अनाज' उपक्रम कौतुकास्पद
मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलने “एक मुट्ठी अनाज” या उपक्रमांतर्गत सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे अन्नदान अभियान राबवले.तसेच विविध संस्थांना संकलित साहित्य सूपूर्द केले.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे म्हणत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली निमित्त लवकरच लक्ष लक्ष दिव्यांनी पूर्ण आसमंत उजळून जाणार आहे. मात्र,सर्वांनाच या सणानिमित्त गोडधोड मिळत नाही.त्यामुळे काही शिक्षण संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून समाजातील गरजूंना मदतीचा हात देत आहेत. मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलने “एक मुट्ठी अनाज” या उपक्रमांतर्गत सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे अन्नदान अभियान राबवले.तसेच विविध संस्थांना संकलित साहित्य सूपूर्द केले.
दिवाळी निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे संचालक विश्वस्त नरेंद्र सिंह, डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, महेंद्र सिंह आणि सरिता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, असे विविध सामाजिक उपक्रम शाळेकडून राबवले जातात. “एक मुट्ठी अनाज” हा त्याचाच एक भाग होता.
“एक मुट्ठी अनाज” या उपक्रमासाठी रझिया लखानी, ईपीटीए सदस्य आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. उपक्रमातून जमा झालेल्या वस्तू व इतर साहित्य स्वामी समर्थ वृद्धाश्रम (चिखली), सiवली निवारा (पिंपरी) आणि ब्लाइंड स्कूल (पांजरापोल) यांना सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहानुभूतीचे महत्त्व पटले.